बंगला लिलाव प्रकरणी सनी देओलने सोडले मौन, म्हणाला बॅंकेच्या त्या गोष्टीने दुखावलो

चित्रपटात सनी देओल हनुमानाची भूमिका साकारणार असल्याचे सांगितले जात आहे

अभिनेता सनी देओल यांचा ‘गदर 2’ बॉक्सऑफिसवर जबरदस्त हिट ठरत असताना काही दिवसांपूर्वी हा अभिनेता  अडचणीत असल्याचे समोर आले होते. त्याच्या जूहू येथील सनी व्हिला बंगल्याच्या लिलावाची जाहीरात बॅंकेने प्रसिद्ध केली होती. त्यामध्ये असेही लिहीले होते की, सनीने वेळेत थकबाकी न दिल्याने बॅंकेने हे पाऊल उचलल्याचे सांगितले होते. मात्र बंगला लिलाव प्रकरणी आता त्याने एका मुलाखतीत यावर मौन सोडले आहे.

काही दिवसांपूर्वी मुंबईतील जूहू येथील सनी देओलच्या बंगल्याचा लिलाव करण्यात येत असल्याची जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली होती. ज्यावर सनीने 56 कोटींचे कर्ज घेतले होते. पण त्यानंतर बॅंकेने ही नोटीस तांत्रिक बिघाड असल्याचे कारण देत रद्द केली. यावर आता एका वाहिनीशी बातचीत करताना बँकेच्या या तांत्रिक बिघाडावर सनी देओल याने  प्रतिक्रिया दिली आहे. त्याने सांगितले की, ”अशाप्रकारच्या गोष्टींकडे मी ना लक्ष देत ना त्यावर प्रतिक्रिया देत. मला माहित आहे माझ्याकडे काय आहे, मला काय सांगायचे आहे, अडचण काय होती आणि मला यातून मार्ग कसा काढायचा आहे. पण मी या गोष्टीने जास्त दुखावलो गेलो की बॅंकेने ती नोटीस वर्तमान पत्रात दिली”.

पुढे तो म्हणाला की, ”मी माझ्या मनातच विचार केला की, बँकेला हे असे करुन काय मिळाले? काही माणसं बिझनेस करतात, त्याने त्यांना अनेकदा नुकसानही सहन करावे लागते पण जेव्हा ती व्यक्ती नुकसान भरण्यास सक्षम नसते तेव्हा तुम्ही त्यांच्या संपत्तीवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करता. काहींना दुसऱ्या लोकांना खाली पाडायला मजा येते. तसेच जेव्हा माझ्यासमोर ही गोष्ट आली त्यावेळी मी त्याला फारसे महत्व दिले नाही पण अनेकांनी त्याचा आनंद घेतला. मी अनेकदा पाहीले आहे की, तुम्ही जी काही निंदा करायची आहे ते करत राहा, मला त्याने काही फरक पडत नाही. मला माहित आहे मी काय आहे आणि काय करु शकतो.

सनी देओल याचा ‘गदर 2’ हा सिनेमा हिट झाला असून बॉक्स ऑफिसवर 474.35 कोटींची कमाई केली आहे. हा आकडा पाहून सनी देओल समाधानी आहे.