बॉल समजून बॉम्ब उचलला; स्फोटात चिमुरडय़ाचा मृत्यू

पश्चिम बंगालमधील हुगळीत आज पांडुआ येथे झालेल्या स्पह्टात चिमुरडय़ाचा मृत्यू झाला. मुलांनी खेळताना बॉल समजून बॉम्ब उचलला. त्यामुळे बॉम्बचा स्पह्ट झाल्याचे सांगण्यात येत आहे. या दुर्घटनेत तीन मुले जखमी झाली. मुलांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. 11 वर्षीय राज विश्वासला रुग्णालयात नेण्यात आले. परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले तर एका मुलाला हात गमवावा लागला. पांडुआच्या तिन्ना नेताजीपल्ली कॉलनीत तलावाच्या काठावर मुले खेळत होती. अचानक स्थानिक लोकांना स्पह्टाचा मोठा आवाज आला. त्यामुळे स्थानिकांनी आवाजाच्या दिशेने धाव घेतली तर मुले बॉम्बस्पह्टात होरपळल्याचे चित्र दिसले. दरम्यान, दोन मुलांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.