अभी तो हम जवान हैं…

 

दुसऱया महायुद्धात लढाई लढलेला जवान हेरॉल्ड टेरेन्स वय 100 आणि 96 वर्षांची प्रेयसी जीन स्वरलेन लवकरच विवाहबद्ध होणार आहेत. अभी तो हम जवान हैअसे म्हणत हे जोडपे जून 2024 मध्ये लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत.

या दोघांची प्रेमकहाणी भन्नाट आहे. हे दोघे शाळेपासून मित्र आहेत. परंतु कालांतराने दोघांना विभक्त व्हावे लागले. वेगवेगळ्या जोडीदारासोबत लग्न करावे लागले. परंतु नशिबाने या दोघांना पुन्हा एकदा एकत्र आणले आहे. खूप वर्षांनंतर या दोघांची भेट झाली. पुन्हा एकदा प्रेम झाले, एकमेकांना डेट केले आणि आता त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.

हेरॉल्डसोबत पहिली भेट 1942 साली झाली होती. त्यावेळी मी शाळेत होते. त्यावेळी 20 वर्षीय हेरॉल्ड अमेरिकन सैन्यात होते, असे स्वरेलिन यांनी सांगितले. त्या पुढे म्हणाल्या, 79 वर्षांनंतर 2021 मध्ये अचानक आम्ही दोघे एका नातेवाईकाकडे भेटलो. त्यामुळे आमच्यात पुन्हा एकदा प्रेम झाले. आम्ही एकमेकांना डेट केले. साखरपुडाही केला आहे. आता लग्नाची गाठ बांधणार आहोत.