रावेर लोकसभेत भाजपमध्ये खदखद; रक्षा खडसेंना विरोध, 200 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

रावेर लोकसभा मतदारसंघातून भाजपने रक्षा खडसे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे. यावरून भाजप कार्यकर्त्यांत प्रचंड असंतोष असल्याचे दिसून येत आहे. रक्षा खडसेंच्या उमेदवारीला विरोध करत 200 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. भाजपने दुसरा उमेदवार दिल्यास प्रामाणिकपणे काम करण्यास कार्यकर्ते तयार आहेत, असे राजीनामा देणाऱ्यांचे म्हणणे आहे.

 रावेर लोकसभेच्या खासदार असणाऱ्या रक्षा खडसेंनी कायम आपल्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले. त्या कधीही संपर्कात राहिल्या नाहीत. यामुळे भाजप कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांत प्रचंड नाराजी असल्याचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील काळे म्हणाले.  रक्षा खडसेंना विरोध म्हणून 203 पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे, असे त्यांनी सांगितले. रक्षा खडसे यांच्याबाबत नाराजी आहे.

निवडणुका आल्या की कार्यकर्ते आठवतात

भाजपमध्ये बूथप्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख अशी रचना लावण्यात आली आहे. निवडणुका आल्या की त्यांची आठवण येते. निवडणूक संपली की आमदार, खासदार कोणीच ओळखत नाहीत. त्यामुळे आमची विनंती आहे की, या लोकांचा विचार ऐकूनच समोरच्या व्यक्तीला तिकीट जाहीर केले पाहिजे, असे ओबीसी मोर्चाचे शहराध्यक्ष गोलू राणे म्हणाले.