Photo – ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षितच्या फोटोंनी चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवले

बॉलिवूडची ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षितच्या सौंदर्याची भुरळ आजही पडते. आपल्या दमदार नृत्य आणि अभिनय शैलीमुळे अनेक दशके बॉलीवूडवर अधिराज्य गाजवतेय. नुकतेच तिने अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्रीवेडिंग सोहळ्यातील लूक लक्षवेधक ठरले आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये ती जंगल-थीम लूकमध्ये दिसली. फोटोंमध्ये माधुरी हिरव्या-निळ्या रंगाचा प्रिंटेड को-ऑर्डरमध्ये दिसत आहे. तिने  केसांना कर्ल्स केले होते . तर डोक्यावर हॅट घातली असून यात ती खूप सुंदर दिसत आहे. चाहत्यांनीही तिच्या फोटोंचे कौतुक केले आहे.