हल्ल्याचा मास्टर माईंड मिंधे गटाचा सुरजित पंजाबी मारेकऱयाने दिली कटाची कबूली

कल्याण – बदलापूर रस्त्यावर 7 मार्चला चिंकू लबाना या कुख्यात गुंडावर झालेल्या हल्ल्याचा मास्टरमाईंड मिंधे गटाचा पदाधिकारी सुरजित पंजाबी असल्याचे उघडकीस आले आहे. सुरजित यानेच हा कट रचला होता अशी कबुली अटक झालेल्या आरोपीने दिली आहे.

कुख्यात गुन्हेगार चिंकू लबाना हा 7 मार्च रोजी सकाळच्या सुमारास अनिल अशोक सिनेमा समोरील मोंजिनिस केक शॉप समोर त्याच्या सहा मित्रांबरोबर उभा होता. त्यावेळी नेवी नगरच्या प्रवेशद्वारातून आलेल्या सहा जणांच्या टोळक्याने चींकुला मोटार सायकल वरून खाली खेचून धारदार शास्त्रांनी त्याच्यावर वार केले. त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या गुह्यात अटक केलेल्या आकाश जाधव या आरोपीने हा हल्ला सुरजीत पंजाबीच्या इशाऱयावरून केल्याची कबुली दिली आहे. त्यामुळे सुरजितला या गुह्यात आरोपी बनवले असले तरी त्याला अटक केली नाही. या प्रकरणी चिंकूची आई आशा लवाना यांनी पोलीस उपायुक्त सुधाकर पाठारे यांची भेट घेऊन निष्पक्ष पद्धतीने माझ्या मुलावर झालेल्या हल्ल्याचा तपास करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलीस पथक सुरजित पंजाबी याचा शोध घेत असल्याची माहिती मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांनी दिली आहे.