साप्ताहिक राशीभविष्य – रविवार 24 डिसेंबर ते शनिवार 31 डिसेंबर 2023

>> नीलिमा प्रधान

मेष – क्षुल्लक गैरसमज होतील

मेषेच्या अष्टमेषात शुक्र, भाग्येषात मंगळ, वृश्चिकेत बुध वक्री. जवळच्या व्यक्तीमध्ये क्षुल्लक गैरसमज, तणाव होतील. नोकरीत वरिष्ठांची मर्जी वाढेल. बदल शक्य. धंद्यात लाभ होईल. जास्त मोह नको. नवीन परिचय पारखून घ्या. राजकीय, सामाजिक क्षेत्रात महत्त्व वाढेल. डावपेच योग्य ठरतील. कुटुंबात खर्च होईल.
शुभ दिनांक : 25, 26

वृषभ -रागावर ताबा ठेवा

वृषभेच्या सप्तमेषात शुक्र, बुध वक्री. अष्टमेशात मंगळ. प्रत्येक दिवस मनोबल टिकवणारा असेल. वरिष्ठ कठोर बोलतील. नोकरीच्या ठिकाणी कामात सतर्क रहा. धंद्यात वाढ होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमच्या विरोधात कारस्थाने होतील. रागावर ताबा ठेवा. प्रवासात काळजी घ्या. नियम पाळा.
शुभ दिनांक : 27, 30

मिथुन – नोकरीत प्रभाव राहील

मिथुनेच्या षष्ठेशात शुक्र, बुध वक्री. सप्तमेषात मंगळ. सप्ताहाच्या सुरूवातीला तणाव, गैरसमज होतील. नोकरीत प्रभाव राहील. बदलही घडतील. धंद्यात मोहाला बळी पडू नका. चर्चेत सावध रहा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वरिष्ठांना मदत करावी लागेल. विचारांचा गुंता वाढेल. प्रश्न रेंगाळत ठेवू नका.
शुभ दिनांक : 28, 30

कर्क – अहंकार दूर ठेवा

कर्केच्या पंचमेषात शुक्र, बुध वक्री. षष्ठेशात मंगळ. अतिशयोक्तीपूर्ण गोष्टी टाळा. अहंकाराने नुकसान होईल. नोकरी टिकवा. धंद्यात वाढ होईल. व्यवसायात नवे कंत्राट मिळेल. करारात घाई नको. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमचा अपमान होण्याची शक्यता. तुमचा राग वाढवण्याचा प्रयत्न होईल. नम्र रहा. कायदा पाळा.
शुभ दिनांक : 24, 25

सिंह – आरोग्याची काळजी घ्या

सिंहेच्या सुखस्थानात शुक्र, बुध वक्री. पंचमेषात मंगळ. आरोग्याची काळजी घ्या. मनावर दडपण राहील. नोकरीत कठीण कामे करावी लागतील. धंद्यात नम्रता बाळगा. उधारी नको. राजकीय, सामाजिक क्षेत्रात मानसन्मान लाभेल. जवळच्या व्यक्ती गैरसमज करून घेतील. कौटुंबिक कामे वाढतील.
शुभ दिनांक : 24, 25

कन्या – वाद वाढवू नका

कन्येच्या पराक्रमात शुक्र, बुध वक्री. सुखस्थानात मंगळ. कायदा, सुव्यवस्था पाळा. नोकरीत वाद वाढवू नका. निष्कारण तणाव होईल. मनोधैर्य टिकेल. धंद्यात लाभ होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कठेर वक्तव्याचे भाषण समस्या निर्माण करेल. मैत्रीपूर्ण वातावरण ठेवा. चातुर्य वापरा. स्पर्धा सोपी नाही.
शुभ दिनांक : 24, 25

तूळ – कामाचे कौतुक होईल

तुळेच्या धनेषात शुक्र, बुध वक्री. पराक्रमात मंगळ. सप्ताहाच्या सुरूवातीला तडजोड स्वीकारावी लागेल. नोकरीत कामाचे कौतुक होईल. स्वतचे प्रश्न सोडवा. धंद्यात फायदा होईल. नवे काम मिळेल. खरेदीविक्रीत नफा होईल. जनपसंपर्क वाढेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात सन्मान मिळेल.
शुभ दिनांक: 27,28

वृश्चिक – परिचय प्रेरणादायक

स्वराशीत शुक्र, बुध वक्री. धनस्थानात मंगळ. खरेदीविक्रीत अंदाज बरोबर येईल. नोकरीत कामाचे कौतुक होईल. नवीन परिचय प्रेरणादायक वाटेल. धंद्यात सुधारणा होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील जटील प्रश्न मार्गी लावता येतील. दौऱयात, भेटीत, चर्चेत यश मिळेल. मैत्री वाढेल.
शुभ दिनांक : 29, 30

धनु – नोकरीत व्याप वाढेल

धनुच्या व्ययेषात शुक्र, बुध वक्री. स्वराशीत मंगळ. आठवडा कसोटीचा, धावपळीचा दगदगीचा ठरेल. कामात अडचणी येतील. प्रकृतीची काळजी घ्या. नोकरीत व्याप वाढेल. धंद्यातील नुकसान टाळता येईल. मोह नको. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमच्या आत्मविश्वासाची छाप पडेल. डावपेच जपून टाका.
शुभ दिनांक : 27, 28

मकर – कायदा पाळा

मकरेच्या एकादशात शुक्र, बुध वक्री. व्ययेषात मंगळ. कोणताही प्रश्न शांतचित्ताने सोडवा. राग, संताप, अहंकार वाढेल. सौम्य धोरण ठेवा. धंद्यात गोड बोला. राजकीय, सामाजिक क्षेत्रात विरोधक कोंडीत पकडतील. कायद्याच्या चौकटीत राहून कृत्य करा. कुटुंबातील वृद्धांची चिंता जाणवेल. सावध रहा.
शुभ दिनांक : 24, 25

कुंभ -कष्टातून यश मिळेल

कुंभेच्या दशमेषात शुक्र, बुध वक्री. एकादशात मंगळ. साडेसाती सुरू आहे. तुमचे वक्तव्य सत्य असले तरी विरोधक कांगावा करतील. नोकरीत तणावातून, कष्टातून यश मिळेल. नवीन परिचय उपयुक्त ठरतील. धंद्यात लाभ होईल. कठीण कामे करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कामे करताना क्षुल्लक अडथळे येतील.
शुभ दिनांक : 27, 28

मीन -प्रगतीचा टप्पा गाठाल

मीनेच्या भाग्येषात शुक्र, बुध वक्री. दशमेषात मंगळ. प्रत्येक दिवस यशस्वी करा. प्रगतीचा नवा टप्पा गाठा. किचकट कामे करा. नोकरीधंद्यात जम बसेल. सुधारणा होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात उत्साहाचे नवे दालन खुले होईल. कामाची प्रशंसा होईल. चर्चेत, भेटीत प्रभाव दिसेल. घरगुती कामे करा.
शुभ दिनांक : 29, 30