प्रसिद्ध शायर मुनव्वर राणा यांच्या घरी चोरी

प्रसिद्ध  शायर मुनव्वर राणा यांच्या घरी 40 लाखांची चोरी झाली आहे. ते लखनऊ येथील हुसैनगंजमधील अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्ये राहतात. सध्या त्यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांच्यावर पीजीआय हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. घरी कोणी नसल्याचा फायदा घेत घरातील 40 लाखांचे सोने चोरटय़ांनी पळवले. मुनव्वर हे हॉस्पिटलमध्ये असून कुटुंबही हॉस्पिटलमध्ये उपस्थित होते. याचा गैरफायदा घेत चोरटय़ांनी त्यांच्या घरात चोरी केली. चोरीला गेलेले सोने हे त्यांची मुलगी फौजिया हिचे होते. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.