पूनावाला फिनकॉर्पच्या कर्जवितरणात गेल्या वर्षीच्या तुलनेत 114 टक्क्यांची वाढ

गैर बँकिंग वित्तपुरवठा करणारी कंपनी, या कंपनीच्या कर्जवितरणात गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल 114 टक्क्यांनी वाढ झाली आहे. या कंपनीने 30 जून रोजी संपलेल्या तिमाहीनंतर आपले वित्तीय आकडे सादर केले आहेत. यामध्ये कंपनीच्या वितरणात आणि कंपनीच्या अधिपत्याखाली असलेल्या मालमत्तेचे मूल्य या दोन्हीत वाढ झाल्याचे दिसून आले आहे. गेल्या तिमाहीच्या तुलनेत पूनावाला फिरकॉर्पच्या कर्ज वितरणात 11 टक्क्यांची वाढ दिसून आली असून आतापर्यंत कंपनीने 7050 कोटी रुपयांच्या कर्जाचे वितरण केले आहे. यातील बहुतांश वितरण हे कंपनीच्या डायरेक्ट डिजिटल प्रोग्राममुळे झाल्याचे कंपनीने म्हटले आहे.