…तर राजीनामा देऊ म्हणणाऱ्या मिंध्यांना तिकीट देण्याचाही अधिकार नाही; आदित्य ठाकरेंचा टोला

शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर मोठ्या बाता मारणाऱ्या मिंधे गटावर मोठी नामुष्की ओढवली आहे. हिंगोलीतील उमेदवार हेमंत पाटील यांना बदलून त्यांच्या जागी दुसरा उमेदवार द्यावा लागला, तर यवतमाळ-वाशीममधील भावना गवळी यांचाही पत्ता कट होणार आहे. यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उमेदवार पडला तर राजीनामा देऊ म्हणणाऱ्या मिंध्याना तिकीट देण्याचाही अधिकार नाही, असा टोला त्यांनी लगावला. बुलढाणा दौऱ्यावर असताना ते प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधत होते.

हे वाचा – गद्दारांना माफी नाही; उद्धव ठाकरे यांनी ठणकावले, दगाबाजांना पुन्हा शिवसेनेत घेणार नाही!

मिंधे गटाने उमेदवार बदलल्याबद्दल आणि एकाचे तिकीट कापल्याबद्दल प्रतिक्रिया विचारली असता आदित्य ठाकरे म्हणाले की, “याच लोकांना शिवसेनेने, उद्धव ठाकरे यांनी खासदार बनवले होते. एका व्यक्तील तर पाच वेळा खासदार बनवले, पण काल त्यांना 9 ते 10 तास वेटिंगवर थांबूनही तिकीट मिळाले नाही. दुसऱ्या एका मतदारसंघातील खासदारालाही तिकीट मिळालेले नाही. अजूनही दोन-तीन जण आहेत ज्यांची तिकीटं कापली जाणार आहेत. मग मिंध्यांसोबत जाऊन मिळाले तरी काय?”

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

“पक्षासोबत जी गद्दारी करायची होती, उद्धव ठाकरे यांच्या पाठीत जो खंजीर खुपसायचा होता तो त्यांनी खुपसलाच, पण महाराष्ट्रासोबतही बेईमानी केली. शिवसेनेतून बाहेर पडताना एक जरी उमेदवार पडला तर राजीनामा देऊ अशा घोषणा करणारे तिकीटही देऊ शकत नाही. मिंधे गटाचे असे हाल झालेले आहेत. त्यामुळे 40 गद्दारांनी विधानसभेला काय होईल याचा विचार करावा. कारण एक-एक विकेट पडत जाणार आहे”, असा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला.