महाराष्ट्रावर यांचा एवढा राग का? आदित्य ठाकरे यांनी मिंधे सरकारला फटकारले

aaditya thackeray

गणेशोत्सव अवघ्या महिनाभरावर येऊन ठेपला आहे. महिनाभराने लाखो चाकरमानी या गणेशोत्सवासाठी मुंबई गोवा महामार्गाने कोकणात जातील. मात्र दरवर्षीप्रमाणे यंदाही या मार्गाची चाळण झाली आहे. जागोजागी पडलेले भंयकर आणि जीवघेणे खड्डे यामुळे या मार्गावरील प्रवास धोकादायक झाला आहे. त्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रद्रोही राज्य सरकारला खडे बोल सुनावले आहे. तसेच हा गणेशोत्सव तोंडावर आलेला असताना हे महाराष्ट्रद्रोही सरकार हा प्रश्न गांभिर्याने घ्यायला तयार नाहीत, यांचा महाराष्ट्रावर एवढा राग का आहे? असा सवालही त्यांनी ट्विटरवरून केला आहे.

”रायगडच्या पालकमंत्री पदासाठी आस लावून बसलेले आणि त्यासाठी सतत तोंड उघडणारे मुंबई-गोवा हायवे वरच्या खड्ड्यांबाबत मात्र गप्प का? 7-8 वर्ष NHAI हा प्रश्न का सोडवू शकत नाहीये? की हेही मुद्दाम चाललंय? सहनशील कोकणवासीयांना त्रास देण्यासाठी? दरवर्षी गणेशोत्सवासाठी लाखो कोकणवासीय जीव मुठीत घेऊन, त्रास सहन करत याच रस्त्यांवरुन प्रवास करतात. आत्ताही गणेशोत्सव तोंडावर असताना हे महाराष्ट्रद्रोही हा प्रश्न गांभीर्याने घ्यायला तयार नाहीत. महाराष्ट्रावर ह्यांचा एवढा राग का?” असे ट्विट आदित्य ठाकरे यांनी केले आहे.