ही महिला 20 मिनिटांत प्यायली एवढे पाणी, अचानक झाला मृत्यू

पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ शरीराबाहेर टाकले जातात. एका व्यक्तीने दिवसभरात 2 ते 3 लिटर पाणी पिणे आवश्यक आहे, मात्र त्यापेक्षाही जास्त पाणी पिणे शरीराला हानिकारकही ठरू शकते. एका महिलेसोबत अशाच प्रकारची घटना घडली आहे.

अॅश्ले समर्स (35) असे या महिलेचे नाव आहे. एक दिवस ऐश्ले तिचा पती आणि तिच्या 8 आणि 3 वर्षाच्या दोन मुलींसोबत 2 दिवस आठवड्याच्या सुट्टीच्या दिवशी सहलीला गेली होती. तिथे ती अचानक आजारी पडली. तिच्या आजारपणाविषयी तिच्या भावाने सांगितले की, तिला पाणी खूप आवडत असे. त्यामुळे इंडियाना सहलीवेळी तिने खूप वेळा बोटिंग केले. या सहलीवेळी तिला डीहायड्रेशनचा त्रास जास्त प्रमाणात होऊ लागला. त्यामुळे डोकेदुखीचा त्रास होऊ लागला. शरीर हायड्रेट करण्यासाठी ती काही मिनिटांतच 2 लिटर पाणी प्याली. ती 20 मिनिटांत 4 बाटल्या पाणी प्यायली.

सहसा एवढे पाणी पिण्यासाठी एखाद्या व्यक्तीला संपूर्ण दिवस लागतो, परंतु अॅशले काही मिनिटांत इतके पाणी प्याली. त्यामुळे तिला काही वेळातच चक्कर आली. तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आली. काही वेळा तिला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. तिथे तिचा अचानक उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामुळे तिच्या कुटुंबियांना मानसिक धक्का बसला.

रुग्णालयातील डॉक्टरांनी अॅश्लेच्या मृत्यूविषयी सांगितले की, तिच्या मेंदूला सूज आली. यामुळे तिच्या अवयवांना होणारा रक्तपुरवठा थांबला. जेव्हा एखादी व्यक्ती आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी पिते तेव्हा तिला वॉटर टॉक्सिसिटी या समस्येचा सामना करावा लागतो. जास्त पाणी प्यायल्यास पाण्यातील इलेक्ट्रोलाइट्स रक्तात मिसळतात. यामुळे उलटी, डोकेदुखी, थकवा, मळमळणे, गोंधळून गेल्यासारखे वाटणे यासारखे त्रास उद्भवतात.

तिच्या भावाने पुढे असे सांगितले की, ती जर पाण्याऐवजी एखादे वेगळे पेय प्यायली असती आणि थोड्या थोड्या वेळाने पाणी प्यायली असती, तर ती जिवंत राहिली असती. अॅश्लेला तिचे कुटुंबीय आणि मित्रमंडळी यांच्या सोबत वेळ घालवणे जास्त आवडायचे. काही दिवसांपूर्वीच तिने डे केअर सेंटरमध्ये काम करायला सुरुवात केली होती, अशी तिच्या विषयीची भावना तिच्या मित्रमंडळींनी श्रद्धांजली अर्पण करताना व्यक्त केली आहे.