भाजप खासदाराला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

वीजपुरवठा करणाऱया कंपनीच्या अधिकाऱयाला मारहाण केल्या प्रकरणात इटावाचे भाजपचे खासदार रामशंकर कठेरिया यांना दोन वर्षांची शिक्षा झाली आहे. एमपी-एमएलए कोर्टाने शनिवारी कठेरिया यांना दोन वर्षांची शिक्षा आणि 50 हजार रुपयांचा दंड ठोठावला. कठेरिया पेंद्रीय राज्यमंत्री राहिलेले आहेत. 16 नोव्हेंबर 2011 रोजी अधिकाऱयाला जबर मारहाण करण्यात आली होती. या मारहाणीत अधिकारी गंभीर जखमी झाला होता. याप्रकरणी साक्ष आणि संपूर्ण प्रक्रियेनंतर न्यायालयाने कठेरिया यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. या शिक्षेनंतर त्यांची खासदारकी जाऊ शकते.