संकेतस्थळ, मोबाईल ऍप, हेल्पलाईनवर करा तक्रार, हवा प्रदूषणाबाबत पालिकेचे मुंबईकरांना आवाहन

मुंबईत हवेच्या प्रदूषणाबाबत मुंबई महापालिकेने बांधकामाच्या ठिकाणी कठोर नियम लागू केले असून त्याचे उल्लंघन करणाऱया विकासकांची कामेही रोखली आहे. आता या मोहिमेत मुंबई महापालिपेने सर्वसामान्यांनाही सहभागी करून घेतले असून सर्वसामान्यांनाही पालिकेने दिलेल्या संकेतस्थळावर, मोबाईल अॅप आणि हेल्पलाईन क्रमांकावर तक्रार करण्याचे आवाहन केले आहे. यासाठी आज वर्तमानपत्रांमध्ये एकत्रितपणे सर्व संकेतस्थळ, अॅप आणि हेल्पलाईन क्रमांक प्रसिद्ध केला आहे.

मुंबईत सुरू असलेल्या बांधकामांमुळे हवेत धुळीचे कण पसरत असून हवेची गुणवत्ता खालावली आहे. वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी मुंबई महापालिकेने बांधकामांच्या ठिकाणी कठोर नियम जारी केले आहेत तर त्याच्या बरोबरीने आता थेट मुंबईकरांना तक्रार करण्याचे आवाहन केले आहे.

मेट्रो रेल, उड्डाणपूल, रस्ते कामे, शिवडी-न्हावा शेवा ट्रान्स हार्बर, कोस्टल रोड अशी विविध प्राधिकरणासह खासगी विकासकांची एकूण सहा हजार बांधकामे सुरू आहेत. त्यामुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने आता थेट मुंबईकरांनाच आवाहन केले आहे. बांधकामाच्या ठिकाणी नियमावलीचे उल्लंघन, रस्त्यावर कचरा फेकणे, शेकोटी पेटवणे असे प्रकार सुरू असल्यास थेट तक्रार करता येणार आहे.

इथे करा थेट तक्रार!

संकेतस्थळ: www. Portal.mcgm .gov. in n

मोबाईल अॅप: mybmc 24me7

व्हॉट्सअॅप मोबाईल अॅप: 8169681697 हेल्पलाईन नंबर ः 1916