द्रुतगती मार्गालगत बांबूची हिरवाई, इतर झाडांपेक्षा 35 टक्के जादा ऑक्सिजन

मुंबईत वाढणाऱया प्रदूषणाला आळा घालण्यासाठी अनेक उपाययोजना करणारी पालिका आता ईस्टर्न, वेस्टर्न द्रुतगती मार्गाच्या दोन्ही बाजूंनी बांबूंची हिरवाई तयार करणार आहे. यासाठी तब्बल पाच लाख बांबू लावण्यात येणार आहे. बांबू इतर झाडांपेक्षा 35 टक्के जादा ऑक्सिजन देत असल्यामुळे या झाडाची निवड करण्यात आल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.

मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेत महत्त्वपूर्ण असलेल्या पूर्व आणि पश्चिम मार्गावर दररोज हजारो वाहनांची वर्दळ असते. हे मार्ग देखभाल-दुरुस्तीसाठी आता एमएमआरडीएने 2022 मध्ये पालिकेकडे सुपूर्द केले आहेत. या रस्त्यावर धावणाऱया वाहनांमुळे गाडय़ांचा धूर आणि धुळीमुळे प्रदूषण वाढीला चालना मिळते. त्यामुळे दोन्ही मार्गांच्या दोन्ही बाजूंना बांबूंची लागवड करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बांबू हे झाड प्रतिकूल परिस्थिती, कमी पाण्यामध्ये तग धरून राहत असल्यामुळे या झाडाची निवड केल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

असा राबवणार उपक्रम
पूर्व द्रुतगती मार्गालगत भांडुप ते कन्नमवारनगर या तीन किमी जागेत बांबूची लागवड केली जाणार आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना हे बांबू लावण्यात येतील. एकूण सहा किमी जागेत हे बांबू लावण्यात येतील. बांबूच्या सुमारे 1600 जाती आहेत. त्यामुळे या उपक्रमासाठी बांबू वापरण्यात येताना तज्ञ शेतकऱयांची मदत घेण्यात येणार आहे.

मध्य व पश्चिम रेल्वेच्या भूखंडांवर गेली चाळीस वर्षे राहत असलेल्या व अधिकृत कागदपत्रे असलेल्या रहिवाशांना रेल्वेच्या वतीने नोटीस काढल्या आहेत. या रहिवाशांना हक्काचे घर मिळावे या मागणीसाठी आठवले आरपीआय वतीने पुनर्वसन हक्क मोर्चातून आझाद मैदानात एल्गार पुकारला होता.