शेअर बाजाराची घसरगुंडी; बँकिंग सेक्टरला मोठा फटका

शेअर बाजारात नेहमीच चढउतार होत असतात. त्यामुळे शेअर बाजारातील व्यवहार जोखमीचे असतात. गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजार नवनवे उच्च्यांक गाठत होता. त्यामुळे बाजारात तेजी होती. बुधवारीही बाजाराची सुरुवात होताच बाजारात मामुली तेजी होती. त्यानंतर अचानक बाजारात जबरदस्त घसरणीला सुरुवात झाली. याचा सर्वाधिक फटका बँकिंग सेक्टरला बसला असून बँकिंग सेक्टरचे सर्व शेअरमध्ये घरसण झाली आहे.

शेअर बाजारात असलेल्या तेजीनंतर आता बाजारात घसरण होत आहे. बुधवारी बाजाराची सुरुवात तेजीत झाली. त्यानंतर व्यवहार सुरू होताच बाजारात घसरणीला सुरुवात झाली. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकांत 400 अंकांची घसरण झाली. तर राष्ट्रीय शेअर बाजाराच निर्देशांकांत 160 अंकांची घसरण झाली आहे. तर बँकिंग सेक्टरचा निर्देशांक बँक निफ्टीमध्ये 370 अंकांची घसरण झाली आहे.

बाजाराच्या सुरुवातीला सेन्सेक्स 73,162.82 अंकांवर होता. दुपारी 12.30 वाजेपर्यंत त्यात घसरण होत तो 72,606.96 अंकांपर्यंत खाली आला होता. या वेळेपर्यंत सेन्सेक्समध्ये 488.26 अकांची घसरण झाली होती. तर बाजाराची सुरुवात होताच निफ्टी 22,214.10 अंकांवर होता. दुपारपर्यंत त्यात 215 अंकांची घसरण होत तो 21,983.15 वर आला होता.

रिलायन्स इंडस्ट्रीज, टाटा ग्रुप, विप्रो, मारुति सुजुकी अशा लार्ज क२प कंपन्यांच्या शेअरमध्येही मोठी घसरण झाली. तर पेटीएमच्या शेअरला पुन्हा एकदा लोअर सर्किट लागले असून त्यात 4.99 अंकांची घसरण होत तो 406.20 रुपयांवर आला आहे. तर टेलिकॉम कंपनी वोडाफोन-आइडियाच्या शेअरमध्ये 13 टक्के घसरण झाली आहे. बाबा रामदेव यांच्या पतंजलि के शेअरमध्ये 4 टक्के घसरण झाली आहे. सेन्सेक्सच्या 30 शेअरपैकी 27 शेअर लाल निशाणीवर व्यवहार करत होते.या घसरणीचा सर्वाधिक फटका बँकिंग सेक्टरला बसला असून आईडीबीआई बँक, यस बँक, यूनियन बँक या शेअरमध्ये 4 टक्क्यांची घसरण झाली आहे. तसेच बँकिंग सेक्टरमधील सर्व शेअरमध्ये घसरण झाली आहे.