Photo – डोंबिवली एमआयडीसीतील भीषण स्फोटाचे हादरवणारे फोटो समोर

डोंबिवलीतल्या एमआयडीसी भागात सोनारपाडा परिसरात केमिकल कंपनीत मोठा स्फोट झाला. या स्फोटामुळे आजूबाजूचा परिसर हादरला असून त्याची झळ आसपासच्या कंपन्यांना देखील पोहोचल्याचं कळत आहे.  आगीचे लोटच्यालोट बाहेर येत आहेत. या स्फोटात पाच ते सहा कामगार गंभीर जखमी झाले आहेत. परिसरातील अनेक इमारतीच्या काचा तावदाने फुटली आहेत.