बांगलादेशी घुसखोरांना आठ दिवसाची पोलीस कोठडी

बांगलादेश घुसखोरी करणाऱ्या चार जणांना नाशिकच्या एटीएस व नगर तालुका पोलिसांनी छापा टाकून पकडले असून या कारवाईमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. आज अटक केलेल्या चार आरोपींना न्यायलासमोर हजर केले असता 8 दिवसाची पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. दरम्यान या संदर्भात नगर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांनी हे नोकरीच्या शोधात येथे घुसखोरी करून आल्याचे तपासात पुढे आले असल्याचे त्यांनी सांगितले.

आरोपी मध्ये मोहीउद्दीन नाजीम शेख, वय- 36 व्यवसाय निक बेल्डोगकाम, रा. शिवशक्ती स्टोन कशर, खंडाळा, जि. नगर, मुळ रा. मध्यम शोना पहाड, पोस्ट जोरालगंज, ठाणा – जोरालगंज, जि. घटटोग्राम, देश बांगलादेश , शहाबुद्दीन जहाँगीर खान, वय 27, रा. शिवशक्ती स्टोन करार, खंडाळा, जि. नगर, मुळ रा. , पोस्ट कोगाई, जि. कुमिया, देश- बांगलादेश , दिलावरखान सिराजउल्ला खान, वय 27 रा शिवशक्ती स्टोन कर खंडाळा, जि. नगर, मुळ रा. विशणुपूर गाव, 8 नंबर वॉर्ड, पोलीस ठाणा शानबाग, पोस्ट ऑफिस कुतुबीरहाट, जि. नोहाखेरी, देश- बांगलादेश , शहापरान जहाँगीर खान, वय 20 रा. शिवशक्ती स्टोन कशर, खंडाळा, जि. नगर, मुळ रा. चांदीना, पोस्ट कोगाई जि. कुमिया, देश- बांगलादेश, याना अटक केली आहे होती. तर रासल एजाज शेख, सोहेल रानोहारी बांगला देश, माणिक खान, नोमान , अब्दुल कादर से बांगला देश, कोबीर मंडल स 24 परगना, पश्चिम बंगाल पुर्ण नाव पत्ते माहिती नाही हे फरार आहे.

काल अटक केलेल्या चार आरोपींना आज न्यायालयामध्ये हजर केले असता ,काल पकडलेल्या आरोपींकडून अनेक कागदपत्र पोलिसांनी हस्तगत केली आहे. यामुळे शाळेची दाखले ,बनावट साहित्य बनावट ओळखपत्र आधार कार्ड यासह विविध प्रकारची इतर कागदपत्रे पोलिसांना सापडलेली आहे. ही कागदपत्रे त्यांनी कुठून व कशी तयार केली याची पोलीस माहिती घेत आहे .या गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्यामुळे व इतर फरार आरोपींचा शोध घ्यायचा असल्यामुळे या आरोपींकडून अन्य माहिती घ्यायचे आहे असा युक्तिवाद आज न्यायालयामध्ये सरकारी पक्षाच्या वतीने करण्यात आला न्यायालयाने दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकल्यानंतर या आरोपींना आठ दिवसांची पोलीस कोठडीत ठेवन्याचे आदेश दिले आहे. दरम्यान पोलिसांनी खंडाळा या ठिकाणी ते राहत होते त्या ठिकाणची सर्व कागदपत्रे हस्तगत केल्यानंतर मूळ मालकाकडे चौकशी सुरू केलेले आह त्यांच्याकडून काय माहिती येते याकडे लक्ष लागले आहे