फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन प्रजासत्ताक दिनाला प्रमुख पाहुणे म्हणून येणार

प्रजासत्ताक दिनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष एमान्युएल मॅक्रॉन प्रमुख पाहुणे म्हणून येणार आहे. प्रजासत्ताक दिनाला होणाऱ्या पथसंचलनात फ्रान्सच्या सैन्य दलाची तुकडी समाविष्ट होणार आहे. उभय देशांमधील संबंध अत्यंत घनिष्ट असून दोन्ही देशांत संरक्षण, सुरक्षा आणि स्वच्छ उर्जा, व्यापार, गुंतवणूक आणि नवीन तंत्रज्ञान या क्षेत्रात चांगला ताळमेळ बसला आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने हिंदुस्थानात येणारे मॅक्रॉन हे दोन दिवसांच्या दौऱ्यावर असतील. ते दिल्ली आणि जयपूरला भेट देणार असून त्यांच्या शिष्टमंडळात मंत्री, काही कंपन्यांचे प्रमुख अधिकारी, सांस्कृतिक आणि वैज्ञानिक क्षेत्रातील नामवंत मंडळी यांचा समावेश असमार आहे. मॅक्रॉन हे 25 नोव्हेंबरला जयपूरमध्ये उतरणार असून ते मोदी यांच्यासोबत रोडशो मध्ये सहभागी होतील. यानंतर मोदी आणि मॅक्रॉन यांच्यात बैठक होणार असून या बैठकीनंतर काही महत्त्वाच्या घोषणा केल्या जाण्याची शक्यता आहे.