शिक्षणाच्या आयचा घो! गुजरातमध्ये विद्यार्थ्यांना 200 पैकी चक्क 212 गुण मिळाले; चौकशीचे आदेश

 

शाळेत किंवा महाविद्यालयात परीक्षेत पैकीचे पैकी गुण मिळालेली अनेक उदाहरणे आहेत. गुजरातमध्ये एका शाळेत विद्यार्थ्यांना चक्क जेवढ्या गुणांचा पेपर आहे त्यापेक्षा जास्त गुण मिळाले. यामुळे येथील शिक्षण विभागाचे वाभाडे निघाले असून सदर प्रकाराची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

गुजरातमधील दाहोद जिल्ह्यातील झालोद तालुक्यात येणाऱ्या खरसाना गावात हा अजब प्रकार घडला आहे. येथे चौथीत शिकणाऱ्या एका मुलाला दोन विषयात चक्क 200 पैकी 211 आणि 200 पैकी 212 असे गुण मिळाले आहेत. वंशीबेन मनीषभाई असे मुलाचे नाव असून गुणपत्रिका हातात येताच त्याच्या कुटुंबीयांनी शाळेत धाव घेतली.

शाळेने तांत्रिक बिघाड झाल्याने सांगत आधी हात झटकले, मात्र नंतर सुधारित विद्यार्थ्याला गुणपत्रिका दिली. त्यात गुजराती विषयात 200 पैकी 191 आणि गणित विषयात 200 पैकी 190 गुण दिले. वंशीबेन मनीषभाई याला 1000 पैकी 936 गुण मिळाले आहेत.