नितीन देसाई आत्महत्या प्रकरण – ईसीएल फायनान्स, एडलवाईझ ग्रुपच्या पाच जणांवर गुन्हा

प्रख्यात कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्येप्रकरणी ईसीएल फायनान्स आणि एडलवाईझ ग्रुपच्या रशेष शहा, केऊर मेहता, स्मित शहा, आर. के. बन्सल, जितेंद्र कोठारी या पाच जणांवर आज खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ईसीएल आणि एडलवाईझच्या अधिकाऱयांनी केलेल्या मानसिक छळाला पंटाळून देसाई यांनी आत्महत्या केली, अशी तक्रार पत्नी नेहा यांनी केल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. या प्रकरणाचा आता पोलिसांनी कसून तपास सुरू केला आहे.

देसाई वन टाइम सेटलमेंटसाठी तयार होते

नितीन देसाई हे एडलवाईझ कंपनीला कर्जाच्या वन टाइम सेटलमेंटला तयार असतानाही आरोपींनी पद्धतशीर वेळकाढूपणा केला. दरम्यान 180 कोटी कर्जाचा आकडा व्याजासह 252 कोटीवर गेल्यानंतर आरोपींनी एनसीएलटी कोर्टात अचानक धाव घेतली. याचा देसाई यांना धक्का बसला. स्टुडिओवर कब्जा मिळवण्याचा आरोपींचा इरादा होता, असा जबाब देसाई यांची पत्नी नेहा यांनी दिला आहे.

n जितेंद्र कोठारीना एनसीएलटी कोर्टाने कर्जाचे प्रकरण सेटलमेंट करण्यासाठी प्रशासकीय अधिकारी म्हणून नियुक्त केले होते. पण कोठारी फितुर झाला आणि आरोपींशी हातमिळवणी करून देसाई यांना काsंडीत पकडल्याचा आरोपही नेहा देसाई यांनी केला.

नितीन देसाई यांनी मंगळवारी कर्जतच्या एनडी स्टुडिओत गळफास घेऊन आत्महत्या केली. 250 कोटी रुपयांच्या कर्जाचा ताण असह्य होऊन देसाई यांनी मृत्यूला कवटाळले. त्यांनी एडलवाईझ रिक्रिएशन आणि ईसीएल फायनान्स पंपनीकडून 160 कोटींचे कर्ज घेतले होते. कोरोनामुळे झालेली आर्थिक नाकेबंदी आणि त्यानंतर बॉलीवूडने त्यांच्या स्टुडिओकडे फिरवलेली पाठ यामुळे कर्जाचे हप्ते न फेडता आल्याने ते 254 कोटींवर पोहोचले. पंपन्यांनी वसुलीसाठी लावलेल्या तगादा आणि स्टुडिओचा लिलाव करण्यासाठी रायगड जिल्हाधिकाऱयांकडे मागितलेली परवानगी यामुळे प्रचंड तणावाखाली येऊन देसाई यांनी आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी व्हॉईस रेकॉर्डमध्ये काही व्हॉईस क्लिप बनवून त्यात पंपनीकडून प्रचंड मानसिक त्रास दिला जात असल्याची सुसाईड नोट बनवली होती.

तपास उपविभागीय पोलिसांकडे वर्ग

देसाई यांच्या आत्महत्येनंतर खालापूर पोलीस ठाण्यात अकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र देसाई यांच्या पत्नी नेहा यांनी ईसीएल फायनान्स पंपनी आणि एडलवाईझ ग्रुपच्या पदाधिकाऱयांनी कर्ज प्रकरणात वारंवार तगादा लावून मानसिक त्रास दिला. या मानसिक छळाला पंटाळून देसाई यांनी आत्महत्या केली, अशी तक्रार खालापूर पोलिसांकडे दिली. त्यानुसार खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नंबर 269/2023 भारतीय दंड विधान 306, 34 अन्वये एडलवाईझ रिक्रिएशन आणि ईसीएल फायनान्स पंपनीतील पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास खालापूर पोलीस ठाण्याकडून आता उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे.

एडलवाइजचे स्पष्टीकरण

नितीन देसाई यांनी आत्महत्या केल्याची घटना दुःखद आहे. 2016 ते 2018 दरम्यान देसाई यांच्या पंपनीला थिम पार्क आणि अन्य प्रकल्प उभारणीसाठी आर्थिक सहकार्य केले होते. मात्र 2020 पासून देसाई यांची पंपनी आर्थिक अडचणीत सापडली. अनेक प्रयत्नांनंतरही सुधारणा झाली नाही. अखेर 2022 आणि जुलै 2023 मध्ये पंपनी दिवाळखोरीत निघाली. त्यानंतर आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार आणि सर्व कायदेशीर प्रक्रियांच्या अधीन राहूनच देसाई यांच्या पंपनीची दिवाळखोरीची प्रक्रिया सुरू केली. त्यांच्यावर वसुलीसाठी कुठल्याही प्रकारचा दबावही टाकला नाही, असे स्पष्टीकरण एडलवाइज पंपनीने दिले आहे.