गौतम अदानींनी घेतली शरद पवारांची भेट, सिल्वर ओक निवासस्थानी तीन तास झाली चर्चा

उद्योगपती गौतम अदानी यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची शुक्रवारी भेट घेतली. राष्ट्रवादीमधील फुटीनंतर दोघांमध्ये ही भेट झालेली आहे. शरद पवारांच्या मुंबईतील सिल्वर ओक या निवासस्थानी दोघांमध्ये तीन तास भेट झाली आहे. रात्री 9 ते 12 वाजेपर्यंत दोघांमध्ये चर्चा सुरु होती. या भेटीमध्ये राष्ट्रवादीमधील फूट व सध्याच्या राजकीय घडामोडींबद्दल चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.

या वर्षात याआधी दोनदा शरद पवार आणि गौतम अदानी यांच्यात मुंबईतील निवासस्थानी भेट झाली. या बैठका अत्यंत गोपनीय ठेवण्यात आल्या होत्या. अदानी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जवळचे मित्र मानले जातात. त्यामुळे या भेटीमागे अनेक राजकीय तर्क वितर्क लावले जात आहेत.