घाटकोपर, भांडुपला मिळणार मुबलक पाणी, पालिका करणार 90 कोटींचा खर्च

पालिकेच्या पूर्व उपनगरातील एन विभाग घाटकोपर, विक्रोळी आणि एस विभाग भांडुप भागातील टेकडीवरील भागांना लवकरच मुबलक पाणीपुरवठा मिळणार आहे. यासाठी पालिका या भागासाठी 22 लाख लिटर क्षमतेची पाण्याची भूमिगत टाकी, पंपिंग स्टेशन बांधणार असून नव्या जलवाहिन्या टाकून पाणीपुरवठा सुरळीत करणार आहे. यासाठी पालिका 89 कोटी 42 लाख 31 हजार 196 रुपये खर्च करणार आहे. भूमिगत पाण्याच्या टाकीतून आनंद गड, पंचशील सोसायटी, राम नगर परिसरात पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याने येथील पाणी समस्या दूर होईल, असा विश्वास पालिकेच्या जल विभागाकडून व्यक्त करण्यात आला.

पूर्व उपनगरातील काही टेकडीवरील भागांना उंचीमुळे पुरेसा पाणीपुरवठा होत नाही. यातच मुंबईला पाणीपुरकठा करणाऱया अनेक ब्रिटिशकालीन जलवाहिन्या जीर्ण झाल्या आहेत. शिवाय मुंबईला पाणीपुरवठा होणाऱया पाण्यातील तब्बल 27 टक्के पाणी गळतीमुळे वाया जाते. यामुळेही मुंबईतील अनेक भागांत पाणी पुरवठय़ावर परिणाम होतो. ही समस्या दूर करण्यासाठी पूर्क उपनगरातील घाटकोपर, किक्रोळी, भांडुप येथील जुन्या जलकाहिन्या बदलत किकिध क्यासाच्या नकीन जलकाहिन्या टाकण्यात येणार आहेत.