नूंहमध्ये 97 घरांवर बुलडोझर

नूंह हिंसाचारात सहभागी असलेल्या जवळपास 36 हिंसक आंदोलनकर्त्यांनी अवैधपणे उभारलेल्या घरावर शनिवारी पालिकेकडून बुलडोझर फिरवण्यात आला. पोलीस आणि जिल्हा प्रशासनाच्या पथकाने या अवैध बांधकामांवर तोडक कारवाई केली. सरकारी जागेवर 97 अवैध घरे बांधण्यात आली होती. ही सर्व घरे जमीनदोस्त करण्यात आली. ज्या घरावर तोडक कारवाई करण्यात आली. त्यात राहत असलेले लोक हे नूंह हिंसाचारात सहभागी होते, असा आरोप करण्यात आला होता, असे सरकारी अधिकाऩयांनी सांगितले. पोलीस या प्रकरणात सर्व बाजुंनी तपास करीत आहे.