नेपाळमध्ये हेलिकॉप्टर कोसळले; 5 मृतदेह बाहेर काढले, एक बेपत्ता

प्रातिनिधिक फोटो

नेपाळमधील माउंट एव्हरेस्टजवळ मंगळवारी झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात पाच मेक्सिकन नागरिकांसह सहा जणांचा मृत्यू झाला. बचावकर्त्यांना पाच मृतदेह सापडले आहेत आणि सहावी व्यक्ती बेपत्ता असून त्याचा शोध घेतला जात आहे, अशी माहिती काठमांडू विमानतळाच्या अधिकाऱ्यानं रॉयटर्सला दिली.

खासगी व्यावसायिक हेलिकॉप्टर सोलुखुन्व्हू जिल्ह्यातील सुर्के येथून माउंट एव्हरेस्ट आणि इतर उंच पर्वत शिखरांवर पोहोचणार होते, मात्र उड्डाणाच्या 15 मिनिटांत त्याचा संपर्क तुटला.

एव्हरेस्ट या प्रेक्षणीय स्थळी पाच परदेशी पर्यटकांना घेऊन जाणारे मनांग एअर हेलिकॉप्टर मंगळवारी सकाळी सोलुखुन्व्हूहून काठमांडूला परतत असताना लामजुरा येथे कोसळले. हेलिकॉप्टरचा ढिगारा लामजुरा येथील गावातील रहिवाशांनी शोधला.

9N-AMV क्रमांकाचं हेलिकॉप्टर सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास लामजुरा पास परिसरात रडारपासून दूर गेले.

नेपाळमध्ये विमान अपघातांचा इतिहास आहे. येथील नैसर्गिक परिस्थिती, बदलत राहणारे हवामान, यामुळे अनेकदा विमान अपघात झाल्याचं पाहायला मिळालं आहे.