अखेर अंजूविरोधात पतीने दाखल केला गुन्हा

पाकिस्तानात गेलेल्या अंजूविरुद्ध अखेर तिचा पती अरविंदने पोलीस ठाण्यात जाऊन गुन्हा दाखल केला. यात अंजूचा पाकिस्तानमधील पती नसरुल्लाहच्या नावाचाही समावेश आहे. घटस्पह्ट न घेता अंजूने दुसरा विवाह केला. अंजूने पह्नवर धमकी दिली यासह अनेक गंभीर आरोप अरविंदकडून करण्यात आले आहेत.

अंजूचा पहिला पती अरविंदने भिवाडीच्या फुलबाग पोलीस ठाण्यात जाऊन अंजूविरुद्ध गुन्हा दाखल केला. अरविंदने शुक्रवारी रात्री 9 च्या सुमारास पोलीस ठाण्यात धाव घेत कलम 494 (पहिला विवाह झालेला असताना दुसरा करणे), 500 (मानहानी), 506 (जीवे मारण्याची धमकी देणे), आयटी अॅक्ट 43 आणि 66 (कोणत्याही डिव्हाइसने आपत्तीजनक साहित्य पाठवणे) याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. घटस्पह्ट न घेता दुसरा विवाह करणे कायद्याने गुन्हा आहे. दोषी आढळणाऱया व्यक्तीला 7 वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते. दरम्यान, 20 जुलै रोजी अंजूने आपला पाकिस्तानमधील फेसबुक मित्र नसरुल्लाहशी निकाह केला. तसेच तिने धर्मपरिवर्तन करीत नवीन फातिमा हे नाव धारण केले आहे.