हिंदुस्थान चिनी गुंतवणुकीसाठी खुला, केंद्रीय मंत्र्यांचं विधान

Union Minister Rajeev Chandrasekhar

दोन्ही देशांमधील सीमा संघर्ष असूनही हिंदुस्थान चिनी गुंतवणुकीसाठी खुला आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी बुधवारी प्रकाशित केलेल्या एका अहवालात फायनान्शियल टाइम्सला दिली आहे.

‘कोणत्याही कंपनीसोबत जोपर्यंत ते गुंतवणूक करत आहेत आणि त्यांचा व्यवसाय कायदेशीररित्या चालवत आहेत आणि हिंदुस्थानी कायद्यांचे पालन करत आहेत तोपर्यंत आम्ही व्यवसाय करण्यास तयार आहोत’, असं चंद्रशेखर यांनी फायनान्शियल टाइम्सला सांगितलं, हिंदुस्थान ‘चिनीं’सह सर्वांना गुंतवणुकीसाठी खुला आहे.

2020 मध्ये दोन्ही देशांमधील सीमा संघर्षानंतर नवी दिल्लीनं चिनी व्यवसायांची छाननी वाढवली आणि टिकटॉकसह 300 हून अधिक चिनी अॅप्सवर बंदी घातली. तेव्हापासून हिंदुस्थाननं चिनी कंपन्यांच्या गुंतवणुकीची छाननी तीव्र केली आहे.

इकॉनॉमिक टाइम्सनं गेल्या आठवड्यात प्रकाशित केलेल्या एका अहवालात म्हटलं आहे की, चीनच्या गुंतवणुकीच्या संदर्भात सुरक्षेच्या कारणास्तव देशात 1 अब्ज डॉलरचा कारखाना उभारण्याचा चिनी वाहन निर्माता BYD Co चा प्रस्ताव हिंदुस्थाननं नाकारला.

तर, फायनान्शियल टाइम्सने या प्रकरणाची थेट माहिती असलेल्या अज्ञात व्यक्तीचा हवाला देऊन BYDचा अर्ज ‘प्रलंबित आणि अद्याप वैध’ असल्याचं सांगितलं.

देशाच्या वाणिज्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी टिप्पणीच्या विनंतीला प्रतिसाद दिला नाही. BYD ने प्रतिक्रिया देण्याच्या विनंतीला त्वरित प्रतिसाद दिला नाही, असं इंग्रजी वृत्तपत्राच्या संकेतस्थळावर नमूद करण्यात आलं आहे.