इसिसने महाराष्ट्र-गुजरातेत ड्रोन हल्ल्याचा कट रचला होता!

आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेट (इसिस) महाराष्ट्रातील मुंबई, पुणे आणि गुजरातमधील अहमदाबाद, सुरतमध्ये हमाससारख्या दहशतवादी हल्ल्याचा कट रचला होता, अशी धक्कादायक माहिती ‘एनआयए’च्या तपासातून समोर आली आहे. गेल्या वर्षी 7 ऑक्टोबरला पॅलेस्टेनमधील संघटना हमासने इस्रायलवर ड्रोन आणि जमिनीवरून हल्ला केला होता. या हल्ल्याप्रमाणे इसिस हिंदुस्थानातील चार शहरांत हल्ला करणार होते.

n या हल्ल्याशिवाय इसिसची या चार शहरांत अंधाधुंद गोळीबार करण्याची योजना होती, परंतु 2 नोव्हेंबरला ‘एनआयए’ने छापा मारून पुण्यात आयएसचे एक मॉडय़ूल उद्ध्वस्त केले होते. या छाप्यावेळी अधिकाऱयांना एक ड्रोन, आयईडी स्पह्टक आणि शस्त्र मिळाले होते. यानंतर ‘एनआयए’ने तीन दहशतवाद्यांना अटक केली होती. चौकशीतून हा सर्व कट उघडकीस आला आहे. ‘एनएआय’च्या छाप्यानंतर दहशतवादी मोहम्मद शाहनवाज आलमला अटक करण्यात आली होती. रिझवान अली, अब्दुल्ला शेख, लियाकत खानसोबत या चार शहरांत रेकी केल्याची कबुली आलमने चौकशीदरम्यान दिली.

n दहशतवाद्यांना विदेशातून फंडिंग मिळणे बंद झाल्यानंतर आलम आणि त्याच्या साथीदारांनी दहशतवादी कारवायांसाठी चोरी आणि घरफोडी केली. आलमने अनेक दुकानांत घुसून चोरी केली. या पैशांचा वापर शस्त्र आणि स्फोटके खरेदी करण्याच्या सामानासाठी केला. एक मोटरसायकल चोरून पसार होण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला पकडले.