प्रज्वलचा पासपोर्ट रद्द करण्यासाठी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचे मोदींना दुसरे पत्र

देशाचे माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा आणि जनता दल (सेक्युलर) पक्षाचे हसनचे खासदार प्रज्वल रेवण्णा याचा डिप्लोमेटिक पासपोर्ट तत्काळ रद्द करा, अशी मागणी करणारे दुसरे पत्र कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिले आहे. सेक्स स्पॅण्डलचे प्रकरण अत्यंत गंभीर असून याआधी पाठवलेल्या पत्रानंतरही कारवाई न होणे अत्यंत निराशाजनक आहे, असे सिद्धरामय्या यांनी पत्रात म्हटले आहे.