केळशी परांजपेआळी किनारा मोहल्ला रस्त्याची दुर्दशा

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या केळशी गावाला धार्मिक सांस्कृतिक कला परंपरेचा एक वारसा आहे. आजपर्यंत या गावाने हिंदु-मुस्लिम ऐक्याची परंपरा कायम जपली आहे. या गावातील विकासाची कामे रखडल्याने त्याचा परिणाम येथील लोकांनी परपरांगत जतन केला, मात्र आता हा वारसा पुसला जात आहे.

दापोली तालुक्यातील केळशी या ऐतिहासिक गावातील परांजपे आळी ते किनारा मोहल्ला या मोठया लोकवस्तीच्या भागाकडे जाणारा पूर्वापार रस्ता आहे. या रस्त्यात पडलेले मोठ मोठाले खड्डे हे पावसाच्या पाण्याने तुडुंब भरले जात असून त्याचा परिणाम हा ऐकरी रस्ते वाहतुकीवर होत आहे, असे असले तरी हा रस्ता सुधारण्याचे नाव काही संबंधित आस्थापने घेत नाहीत. त्यामुळे लोकांच्या जीवनमरणाचा रस्त्याचा विषय तसाच पडून आहे. लोकांच्या जन कल्याणाच्या नावावर सत्ता उपभोगणाऱ्या लोकप्रतिनिधींना जाग कधी येणार आणि या रस्त्याचे काम मार्गी कधी लागणार, याचीच प्रतिक्षा ही परांजपे आळी आणि किनारा मोहल्ल्यातील लोकांना लागली आहे.