यामिनी रेड्डी यांचा कुचिपुडी नृत्याविष्कार

नृत्यकलेचा वारसा पुढे नेणाऱया प्रख्यात कुचिपुडी नृत्यांगना यामिनी रेड्डी यांचा नृत्याविष्कार पाहण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. हा कार्यक्रम येत्या 5 ऑगस्ट रोजी 7.30 वाजता वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर येथे होणार आहे.

  यामिनी रेड्डी ‘ऍन इव्हनिंग ऑफ स्टोरीटेलिंग’ हा कार्यक्रम  सादर करतील. या कार्यक्रमात त्यांना लाइव्ह वाद्यवृंदाची साथदेखील असणार आहे. यामिनीची आई आणि गुरू कौशल्या रेड्डी गायन साथ करणार आहेत.
‘ऍन इव्हनिंग ऑफ स्टोरीटेलिंग’ हा कार्यक्रम दिल्ली, हैदराबाद आणि नेदरलँड येथे सादर झालेला आहे.

 यामिनी यांना तीनवेळा राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. या पुरस्कारांत देवदासी राष्ट्रीय पुरस्कार, फिक्की आणि  संगीत अकादमीचा उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार यांचा समावेश आहे.