उत्तराखंडात बिबटे वाढले

देशातील अनेक राज्यांत वाघांपाठोपाठ बिबटय़ांची संख्या वाढताना दिसत आहे. एकटय़ा उत्तराखंड राज्यात गेल्या 8 वर्षांमध्ये 29 टक्के वाढ झाली आहे. 2015 च्या अखेरच्या महिन्यात करण्यात आलेल्या गणनेनुसार उत्तराखंडमध्ये 2,335 बिबटे होते. या बिबटय़ांची संख्या आता तब्बल 3,115 वर पोहचली आहे. वन विभागाने ही आकडेवारी जाहीर केली आहे. उत्तराखंडमध्ये गेल्या काही वर्षांपासून मानव-बिबटय़ा संघर्ष पाहायला मिळतोय. जानेवारी 2020 ते जून 2023 या कालावधीत उत्तराखंडमध्ये बिबटय़ाच्या हल्ल्यात एकूण 508 लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच 1,800 हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती वनविभागाने दिली आहे.