मलेरियावरही आता लस, जेएनयूच्या शास्त्रज्ञांना यश

मलेरिया आजारामुळे जगभरात दरवर्षी लाखो लोकांचा मृत्यू होतो. डासांमार्फत होणाऱया या आजारावर वेळीच उपचार नाही केले तर रुग्णाला मृत्यू होऊ शकतो. नुकतेच मलेरियाविरोधात प्रभावी लस शोधण्यात शास्त्रज्ञांना मोठे यश मिळालेय. दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील शास्त्रज्ञांच्या टीमने मलेरियावरील लस विकसित केली. सेल प्रेसच्या आयसायन्स नावाच्या जर्नलमध्ये मलेरियाविरोधात संशोधन प्रकाशित झालंय. ही लस विकसित करण्यासाठी प्रोहायबिटिन प्रोटिनचे नवे लक्ष्य आहे.

मलेरिया हा मादी अॅनोफिलीस डासाद्वारे पसरणारा एक वेक्टर- बॉन आजार आहे. या आजाराने आतापर्यंत लाखो लोकांचा बळी घेतला आहे. या आजारावर सातत्याने संशोधन होतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या 2022 च्या अहवालानुसार जगभरात मलेरियाची 24.9 कोटी प्रकरणे आहेत. तसेच सुमारे 60 हजार 800 मृत्यू झाल्याचे भीषण वास्तव आहे.

संशोधकांनी नेमके काय केले?
स्पेशल सेंटर फॉर मॉलिक्यूलर मेडिसनच्या जेएनयूमधील प्राध्यापिका शैलजा सिंह आणि प्राध्यापक आनंद रंगनाथन यांच्या नेतृत्वाखालील टीमने संशोधन केले. यामध्ये संशोधकांनी मानवी शरीरात संसर्ग होण्यास मदत करणारे पॅरेसाईट्सचे इंटरॅक्टिंग कॉम्प्लेक्स ओळखले. पॅरेसाईट प्रोटीन पीएचबी2 एक ताकदवान लस म्हणून काम करू शकते, असे शैलजा यांनी सांगितले. त्रिपुरा येथील मलेरिया रुग्णाच्या शरीरात पीएफपीएचबी2 अँटीबॉडीज आढळल्या. मलेरिया उपचाराच्यादृष्टीने हा टार्ंनग पॉईंट ठरला.