Maratha Reservation दंगलेंद्र फडणवीस राजीनामा द्या! आजपासून उपोषण

जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ल्याचे तीव्र पडसाद राज्यात उमटत आहेत. ठिकठिकाणी आंदोलने, जाळपोळ, दगडफेकीच्या घटना सुरूच आहेत. सिंदखेड राजा येथे संतप्त आंदोलकांनी तहसीलदारांची खुर्ची जाळली. मराठवाडय़ातील पाच जिल्हय़ांत आज कडकडीत बंद पाळण्यात आला. सोलापूर, साताऱयातही उद्रेक झाला तर बारामतीत विराट मोर्चा निघाला. फडणवीसांचा ‘दंगलेंद्र’ असा उल्लेख करत आंदोलक आक्रमक झाले. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी ठाम भूमिका घेत मुंबईत उद्यापासून मराठा क्रांती मोर्चाने बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे. ठाण्यात संतप्त महिलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हाय हाय… अशा घोषणा देत साडी आणि बांगडय़ांचा आहेर दिला.