रेणुकामाता मंदीरातील दागिने चोरीप्रकरणी दोघांना अटक, 7 लाखांच्या मुद्देमाल जप्त

नगर जिल्ह्यातील रेणुकामाता मंदीर चोरीतील सराईत दोन आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.  त्यांच्याकडून 7 लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून  22 गुन्हे उघड झाले आहेत.

गणपत कुंडलिक केदार (46), रा. हातराळ, सैदापुर, ता. पाथर्डी ,अजय छबु चव्हाण (27), जॅकसन ऊर्फ किशोर पुंजाराम जाधव (34), दोन्ही रा. माळीबाभुळगांव, ता. पाथर्डी नगर यांचा आरोपी मध्ये समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी तुषार विजय वैद्य (36), धंदा- पुजारी, रा. पाथर्डी हल्ली रा. रेणुकामाता मंदीर अमरापुर, ता. शेवगांव हे पुजारी असलेल्या रेणुकामाता मंदीराचे अज्ञात आरोपींनी दरवाजाचे कुलूप तोडुन देवीचे अंगावरील 16 लाख 76 हजार 400 रुपये किंमतीचे विविध प्रकारचे सोन्य चांदीचे दागिने चोरुन नेले होते. सदर घटने बाबत फिर्यादी यांनी शेवगांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मंदीरात चोरी झाल्याची घटना संवेदनशील असल्याने पोलीस अधीक्षक राकेश ओला , स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे. दिनेश आहेर यांना स्थागुशाचे विशेष पथके नेमुन गुन्ह्याचा समांतर तपास करुन गुन्हा उघडकिस आणणे बाबत आदेशित केले होते.

या पथकाला कारवाई करणे बाबत सुचना दिल्याने पथके शेवगांव, पाथर्डी परिसरात फिरुन रेकॉर्डवरील आरोपींची माहिती घेताना पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, अमरापुर, ता. शेवगांव येथील रेणुकामाता मंदीरातील चोरी ही इसम नामे गणपत केदार रा. हातराळ सैदापुर, ता. पाथर्डी याने त्याचे इतर साथीदारासह केली असून चोरी केलेले मंदीरातील सोन्या चांदीचे दागिने व आभुषण शेतात पुरुन ठेवलेले आहे. आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने निरीक्षक दिनेश आहेर यांनी प्राप्त माहिती पथकास कळवुन, पंचाना सोबत घेवुन खात्री करुन कारवाई करणे बाबत मार्गदर्शन केले. पथकाने लागलीच हातराळ सैदापुर, ता. पाथर्डी येथे जाऊन संशयीत गणपत केदार याला ताब्यात घेतले. त्याला गुन्ह्यासंदर्भात विचारपूस  केली असता तो उडवा उडवीची उत्तरे देऊ लागला. त्याची कसून चौकशी केली असता त्याचे साथीदार अजय छबु चव्हाण, जॅकसन ऊर्फ किशोर पुंजाराम जाधव दोन्ही रा. माळीबाभुळगांव, ता. पाथर्डी व दोन विधीसंघर्षीत बालक यांना सोबत घेवुन गुन्हा केल्याची कबुली देली.  शेतात पुरलेले मंदीरातील चोरी केलेले सोन्या चांदीचे आभुषण काढुन दिल्याने त्यास मुद्देमालासह ताब्यात घेतले.

आरोपीचे इतर साथीदारांचा शोध घेता ते मिळुन आल्याने त्यांना विविध ठिकणाहुन ताब्यात घेतले. त्यांना त्यांचे नाव गांव विचारता त्यांनी त्यांची नावे , अजय छबु चव्हाण वय 27, जॅकसन ऊर्फ किशोर पुंजाराम जाधव वय 34, दोन्ही रा. माळीबाभुळगांव, ता. पाथर्डी व दोन विधीसंघर्षीत बालक असे सांगितले. ताब्यात घेतलेल्या आरोपींना आणखीन कोठे कोठे गुन्हे केले या बाबत विचारपुस करता त्यांनी नगर जिल्ह्यात गुन्हे केल्याची कबुली दिल्याने गुन्हे अभिलेख पडताळणी करता खालील प्रमाणे एकुण -22 गुन्हे उघडकिस आले आहेत.

आरोपींच्या ताब्यातून 5 लाख ,44, हजार रुपये किंमतीचे सोन्या चांदीचे दागिने, नाग, पत्रा, नथ 50,000- रुपये किंमतीची पॅशन प्रो मोटार सायकल व 1, लाख 25,हजार- रुपये रोख रक्कम असा एकुण 7 लाख 19 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळुन आल्याने आरोपी व दोन विधीसंघर्षीत बालकांना ताब्यात घेवुन शेवगांव पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे. पुढील तपास शेवगांव पोलीस स्टेशन करीत आहे. आरोपी गणपत कुडंलिक केदारहा सराईत गुन्हेगार असून त्यांचे विरुध्द चोरी व फसवणुक असे एकुण -04 गुन्हे दाखल आहेत. तर किशोर पुंजाराम जाधव हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द दरोडा तयारी, जबरी चोरी व चोरी असे गंभीर स्वरुपाचे एकुण -04 गुन्हे दाखल आहेत

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला , अप्पर पोलिस अधीक्षक. प्रशांत खैरे ,. सुनिल पाटील साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, शेवगांव विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर स्थानिक गुन्हे शाखेतील ,हेमंत थोरात, तुषार धाकराव, सोपान गोरे, भाऊसाहेब काळे, बाळासाहेब मुळीक, दत्तात्रय हिंगडे, मनोज गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, सुरेश माळी, अतुल लोटके, पोना/रविंद्र कर्डीले, संदीप दरंदले, संतोष लोढे, सचिन अडबल, विजय ठोंबरे, भिमराज खर्से, संदीप चव्हाण, संतोष खैरे, गणेश भिंगारदे, पोकॉ/ मच्छिंद्र बर्डे, आकाश काळे, रणजित जाधव, रोहित मिसाळ, अमृत आढाव, बाळासाहेब गुंजाळ, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड, /भाग्यश्री भिटे, संभाजी कोतकर, उमाकांत गावडे, भरत बुधवंत व अरुण मोरे अशा पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी ही कारवाई केली.