Elections 2024 – गुजरातमध्ये भाजपला झटका; उमेदवारी दिल्यानंतर निवडणूक लढण्यास दोघांचा नकार

आगामी लोकसभा निवडणुकीपुर्वीच भाजपला गुजरातमध्ये झटका बसला आहे. पक्षाने गुजरातमध्ये उमेदवारी दिल्यानंतर दोघांना निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे. याआधी भाजपने पश्चिम बंगालच्या आसनसोल येथून पवनसिंग या भोजपुरी अभिनेत्याने निवडणूक लढण्यास नकार दिला होता. आता गुजरातमधून उमेदवारी जाहीर झालेल्या दोघांनी निवडणूक लढण्यास नकार दिला आहे.

गुजरातच्या वडोदरा येथून खासदार रंजन भट्ट आणि साबरकांठा येथील भिकाजी ठाकूर यांनी निवडणूक लढण्यास नकार दिला आहे. रंजन भट्ट यांनी व्यक्तीगत कारणांमुळे निवडणूक लढण्यास नकार दिला आहे. तर भिकाजी यांच्या जातीवरून वाद सुरू आहे. त्यामुळे त्यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिल्याचे सांगण्यात येत आहे. रंज भट्ट यांनी एक्सवर पोस्ट केली आहे. मी रंजनबेन भनंजय भट्ट व्यक्तीगत कारणांमुळे लोकसभा 2024 ची निवडणूक लढण्यास इच्छुक नाही, असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

साबरकांठा येथून उमेदवारी मिळालेल्या भिकाजी ठाकूर यांनीही निवडणूक लढण्यास नकार दिला आहे. त्यांच्या जातीवरून वाद सुरू असल्याने त्यांनी निवडणूकीतून माघार घेतल्याची चर्चा आहे. दोनवेळा खासदार असलेल्या दीपसिंह राठोड यांचे तिकीट कापत ठाकूर यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, त्यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर स्थानिक पाताळीवर त्यांच्या जातीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. त्यानंतर त्यांनी निवडणूक लढण्यास नकार दिला आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर दोन जणांनी माघार घेतल्याने गुजरातमध्ये भाजपला झटका बसला आहे.