Online fraud : 37 वर्षीय व्यक्तीला 10.13 लाखांचा गंडा, 4 आरोपींना अटक

ऑनलाईन फसवणूकीच्या घटना गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. नवी मुंबईतून ऑनलाइन फसवणूकीची एक घटना उघडकीस आली आहे. एका 37 वर्षीय व्यक्तीची ऑनलाईन फसवणूक झाली असून त्याला 10.13 लाख रुपयांचा फटका बसला आहे.

पीटीआय या वृतसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने 16 ते 27 जानेवारी दरम्यान पनवेल परिसरात राहणाऱ्या मंगेश (बदलेले नाव) या व्यक्तीशी संपर्क साधला आणि ऑनलाईन प्रीपेड काम करण्याची ऑफर दिली. विश्वास बसल्यामुळे मंगेशने काम स्विकारले आणि त्यानंतर आरोपीने मंगेशला काही लिंक्स पाठवल्या, या कामाचा तुला भरघोस मोबदला मिळेल असे आश्वासन त्याने दिले. मात्र या कामासाठी सुरुवातीला आरोपीने मंगेशला 10 लाख 13 हजार सुरुवातीला भरायला सांगितले. मंगेशने देखील त्याच्यावर विश्वास ठेवून पैसे पाठवले. मात्र काम पुर्ण केल्यानंतर मंगेशला आरोपीने दिलेल्या शब्दानुसार पैसे मिळणे अपेक्षित होते. पण मंगेशला त्याच्या कामाचे काहीच पैसे मिळाले नाही. आरोपीकडे मंगेशने पैशांसाठी तगादा लावला होता. मात्र तो पैसे देण्यास टाळाटाळ करत होता. त्यामुळे मंगेशने त्याचा सुरुवातीला भरलेले तसेच त्याचे 10 लाख 13 हजार रुपये मागितले. मात्र ते देखील तो द्यायला टाळाटाळ करत असल्याने मंगेशला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले.

त्यानंतर मंगेशने पोलीस स्टेशनमध्ये आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली, भारतीय दंड संहितेच्या कलम 419, 420 आणि 34 अंतर्गत चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

अजून एका प्रकरणात नवी मुंबईमधीलचं एका 50 वर्षीय महिलेची 18 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तिघांविरुद्धा गुन्हा दाखल झाला आहे. पीडित महिलेच्या मुलीला आणि जावयाला सरकारी कंपनीत नोकरी देण्याचे आमिष दाखवून पीडितेकडून 20 लाख रुपये आरोपींनी घेतले होते. आरोपींनी 2 लाख रुपये पीडितेला दिले मात्र उर्वरीत 18 लाख रुपये देण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर महिलेने पोलीस स्टेशमध्ये तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.