छत्तीसगडमध्ये नक्षलवादी हल्ला; 3 जवान शहीद, 14 जखमी

छत्तीसगडमधील बीजापूर-सुकमा सीमेवर सुरक्षा रक्षक आणि नक्षलवादी यांच्यात झालेल्या धुमश्चक्रीत तीन जवान शहीद झाले असून 14 जण जखमी झाले आहेत. नक्षली कारवायांना आळा घालण्यासाठी आणि त्यांच्यावर नजर ठेवण्यासाठी सुकमामधील टेकलगुडेम गावात आजच एक सुरक्षा रक्षकाचा कॅम्प बनवण्यात आला होता.

जिल्हा राखीव सुरक्षा रक्षक, कोबरा बटालियन आणि स्पेशल टास्क फोर्स या परिसरात गस्त घालत होते. त्याचवेळी नक्षलवाद्यांनी अचानक जवानांवर गोळीबार केला. सुरक्षा रक्षकांनी याला सडेतोड प्रत्युत्तर दिले.