पालीच्या नगराध्यक्षासह मिंधे गट, शेकापचे चार नगरसेवक अपात्र

सत्तेसाठी पक्षाचा व्हीप झुगारणाऱया पालीच्या नगराध्यक्षा प्रणाली शेळके तसेच मिंधे गट व शेकापच्या बंडखोरांना आज चांगलाच दणका बसला. रायगडच्या जिल्हाधिकाऱयांनी याबाबत निर्णय देताना पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत या सर्वांना अपात्र ठरवले आहे. त्यामुळे पैशाच्या मस्तीत सत्तेचा घोडेबाजार मांडणाऱया या फुटिरांचा राजकीय बाजारच उठला आहे.

जानेवारी 2022 मध्ये पाली नगरपंचायतची पहिली निवडणूक झाली. नगरपंचायत स्थापन झाल्यानंतर येथे अनेक उलथापालथ होत आहेत. नोव्हेंबर 2022 मध्ये नगरपंचायतच्या पहिल्या नगराध्यक्षा गीता पालरेचा यांनी राजीनामा दिल्याने नगराध्यक्षपद रिक्त होते. या रिक्त नगराध्यक्षपदाची निवडणूक विशेष सभेचे आयोजन करून 14 डिसेंबर 2022 मध्ये घेण्यात आली. यावेळी शेकापच्या प्रणाली पाटील-शेळके यांनी बंडखोरी कर नगराध्यक्षपदासाठी अपक्ष अर्ज दाखल केला. यावेळी त्यांना 11 मते तर शेकापचे अधिकृत उमेदवार आरिफ मणियार यांना 5 मते मिळाली. त्यामुळे नगराध्यक्षपदी बंडखोर प्रणाली शेळके निवडून आल्या. या निवडणुकीत मिंधे गटाचे कल्याणी दबके, प्रतीक्षा पालांडे व शेकापच्या विनायक जाधव, प्रणाली शेळके यांनी पक्षादेश डावलल्याने त्यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती.

 

मुख्याधिकाऱयांचे कानावर हात

बंडखोरी करणाऱया नगरसेविका कल्याणी दबके यांनी नगरसेवक सचिन जवके यांच्याविरोधात तीन अपत्य असूनही निवडणूक लढविल्यासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती. या प्रकरणाचीही आज सुनावणी झाली असून सचिन जवके यांना अपात्र ठरवण्यात आले आहे. नगरपंचायतच्या मुख्य कार्यकारी अधिकारी विद्या येरूणकर यांना संपर्क केला असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नका

र दिला.