आरोपीचा रॅपचा व्हिडीओ व्हायरल

pune-Porsche-car-accident

कल्याणीनगरमधील हिट अॅण्ड रन प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचा संगीत रॅप व्हिडीओ व्हायरल झाला आहे. मात्र, व्हायरल झालेल्या व्हिडीओची पुष्टी झाली नसून, तो खरा की खोटा आहे याबाबत शंका उपस्थित होत आहे. दोन निष्पाप जिवांना चिरडून ठार मारल्याचा लवलेशही आरोपीच्या आविर्भावात दिसून येत नाही. रॅप गाण्यासाठी वापरलेल्या शब्दांतून त्याची राक्षसी वृत्ती दिसून येत आहे.

‘करके बैठा मै नशे…इन माय पोर्शे, सामने आया कपल मेरे, अब वो है निचे…. साऊंड सो क्लिशे.. सॉरी गाडी चढ आप पे, 17 साल की उमर, पैसे मेरे बाप के… एक दिन में मिल गयी मुझे बेल.. फिर से दिखा दूंगा सडक पे खेल’ असे तो या व्हिडीओत म्हणताना दिसून येत आहे. अल्पवयीनाला किंचितही पश्चाताप होत नसून आपण पुन्हा हे कृत्य करणार असल्याचे अप्रत्यक्षपणे तो या व्हिडीओत कबूल करताना दिसत आहे. त्याला जामीन मिळाल्यानंतरचा हा व्हिडीओ असल्याचे बोलले जात आहे. हा व्हिडीओ पाहून आता नेटकऱयांपासून सामान्यांपर्यंत संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, हा व्हिडीओ खरा आहे की डीपफेक याचा तपास पोलीस करत आहेत.