ये मोदीवाली नहीं, काँग्रेसवाली; मेरी वॉरंटी के साथ गॅरंटी है

लोकसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यातील युवकांसाठीची आश्वासने आम्ही पूर्ण करू, असा विश्वास काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मालेगाव येथे व्यक्त केला. ‘ये मोदीवाली गॅरंटी नहीं, ये काँग्रेसवाली, हमारी, मेरी वॉरंटी के साथ गॅरंटी है’, असा सणसणीत टोला त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हाणताच ‘राहुल गांधी आगे बढो, हम तुम्हारे साथ है’चा नारा घुमला.

भारत जोडो न्याय यात्रा बुधवारी दुपारी मालेगावात पोहोचली. भव्य रोड शोनंतर नवा स्टॅण्डजवळ राहुल गांधी यांची कॉर्नर सभा झाली. विराट जनसमुदायासमोर ते बोलत होते. निवडणुकीनंतर संविधान नष्ट करण्याचे वक्तव्य भाजपाच्या एका खासदाराने केले. काय पडसाद उमटतात, हे पाहण्यासाठी त्याला मुद्दाम हे वक्तव्य करण्यास सांगितले गेले. संविधान संपविण्याची शक्ती ही मोदीच काय, देशातील कोणत्याच शक्तीत नाही, तसे आम्ही कदापी होऊ देणार नाही. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार कुणाल पाटील, जिल्हाध्यक्ष तुषार शेवाळे, एजाज बेग यांच्यासह पदाधिकारी या यात्रेत सहभागी होते.

– इंडिया आघाडीचे सरकार आल्यावर तीस लाख सरकारी नोकऱया देणार. पहिली नोकरी पक्की या योजनेअंतर्गत डिग्री, डिप्लोमा झालेल्या युवकांना एक वर्षाचे प्रशिक्षण देऊन त्या वर्षी एक लाख रुपये देऊ.

– युवा रोशनी योजनेंतर्गत प्रत्येक जिह्याला वीस कोटी रुपयांचा स्टार्टअप फंड दिला जाईल. गरीबांना व्यवसायासाठी बँकेचे दरवाजे खुले केले जातील. वीज दरवाढ रोखली जाईल. प्रत्येक गरीब महिलेच्या बँक खात्यात वर्षाला एक लाख रुपये टाकले जातील आदी आश्वासने राहुल गांधी यांनी दिली.

– खासगी संस्थांकडून नोकरभरतीची पेपर तपासणी बंद करू. पेपर पह्डणाऱयांवर कडक कारवाई करू. सरकारी यंत्रणेकडूनच ही पेपर तपासणी केली जाईल. ओला, उबेरसारख्या पंपन्यांत डिलीव्हरीचे, ड्रायव्हिंगचे काम करणाऱयांना सोशल सिक्युरिटी म्हणून पेन्शन देणार.