तो विकृत माणूस लिंगपिसाटच, रवींद्र वायकर यांची किरीट सोमय्यांवर जोरदार टीका

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार रवींद्र वायकर यांनी भाजप नेते किरिट सोमय्या यांच्यावर जोरदार टीका केली आहे. किरीट सोमय्या हे विकृत लिंगपिसाट असल्याचा हल्लाबोल त्यांनी केला आहे.

रवींद्र वायकर म्हणाले, खोटा आणि विकृत असलेल्या या माणसाला लिंगपिसाटच बोलले पाहिजे. जाणून बुजून एखाद्या लोकप्रतिनिधीवर आरोप करायचे. त्यांना त्रास द्यायचा आणि मग तो लोकप्रतिनिधी त्यांच्या पक्षात यायला तयार झाला की त्यांचं उदिष्ट साध्य. मग तोच घोटाळ्याचा आरोप झालेला लोकप्रतिनिधी अगदी निरमा पावडरमध्ये धुतल्यासारखा स्वच्छ होऊन जातो. अशाप्रकारची त्याची पद्धत आहे, अशी टीका रविंद्र वायकर यांनी केली आहे.

आर्थिक गुन्हे शाखेकडून शनिवारी रवींद्र वायकर यांची पाच तास चौकशी करण्यात आली. यावेळी त्यांनी चौकशीला घाबरत नाही, पुन्हा बोलावतील तेव्हा जाईन असेही त्यांनी सांगितले.