Video-‘भारत का बच्चा बच्चा जय श्रीराम बोलेगा’ सह अन्य गाण्यांवर शिक्षिकेने बसवला डान्स, विद्यार्थ्यांची रंगीत तालीम

अयोध्या येथील श्रीराम मंदिरात सोमवार, 22 जानेवारी रोजी प्रभू श्रीरामरायाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. या निमित्ताने देशाच्या विविध शहरांमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नागपूरमधल्या एका शाळेमध्ये प्रभू श्रीरामावरील आधुनिक गाण्यांवर डान्स बसवण्यात आले आहेत. एका शिक्षिकेने हे डान्स बसवले असून त्याची रंगीत तालीम शनिवारी पार पडली. हिरव्या रंगाची साडी परिधान केलेली ही शिक्षिका या गाण्यावर नाचत असून तिच्यापाठी असलेले विद्यार्थी त्यांना शिकवल्याप्रमाणे आणि शिक्षिका नाचत असल्याप्रमाणे नाचत असल्याचे पाहायला मिळाले आहे.

राम आएंगे, भारत का बच्चा बच्चा जय श्रीराम बोलेगा, कीजो केसरी के लाल मेरा छोटा सा ये काम मेरी राम जी कह देना जय सियाराम, या गाण्यांवर डान्स बसवण्यात आले आहेत.

सोमवारी महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी

अयोध्या येथील श्रीराम मंदिरात सोमवार, 22 जानेवारी रोजी प्रभू श्रीरामरायाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. त्यानिमित्त केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱयांना अर्धा दिवस सुट्टी जाहीर केली आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनेही 22 जानेवारी रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी आज जाहीर केली.

राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने यासंदर्भात आज अधिसूचना जारी केली. ‘श्री राम लल्ला प्राणप्रतिष्ठा दिन’ असा 22 जानेवारीचा उल्लेख या अधिसूचनेत करण्यात आला आहे. राज्यपाल रमेश बैस यांच्या आदेशानुसार ही सूचना जारी केल्याचेही त्यात नमूद आहे. सोमवारी सर्व सरकारी कार्यालये, शाळा, महाविद्यालये बंद राहणार आहेत, असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे.