शिवनेरीवरील सोहळ्यापूर्वी पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री शिंदेंचे फोटो असलेले बोर्ड अज्ञातांनी फाडले

शिवजयंती निमित्त किल्ले शिवनेरी येथे शिवरायांचा जन्मसोहळ्याचा शासकीय कार्यक्रम झाला. या सोहळ्यानिमित्त किल्ले शिवनेरीच्या पायथ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फोटो असलेले बोर्ड लावण्यात आले होते. मात्र सोहळ्यापूर्वी अज्ञातांनी बोर्डवरील मोदी-शिंदेंचे फोटो फाडले. यामुळे पोलिसांची धावपळ उडाली. मुख्यमंत्री येण्यापूर्वीच हे बोर्ड काढून टाकण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, पायथ्यापासून तर किल्ले शिवनेरीच्या पहिल्या दरवाजापर्यंत असणाऱ्या रोडच्या कडेला असणाऱ्या विजेच्या खांबावरती शिंदे गटाने बोर्ड लावले होते. या बोर्डवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे . पी.नड्डा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे फोटो होते. मात्र शिवजयंतीचा सोहळा सुरू होण्यापूर्वीच हे सर्व बोर्ड अज्ञाताने फाडून टाकले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)