शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडचा रविवारी मुंबईत संयुक्त मेळावा, उद्धव ठाकरे करणार मार्गदर्शन

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व संभाजी ब्रिगेड पदाधिकारी यांच्या संयुक्त मेळाव्याचे आयोजन रविवार 6 ऑगस्ट रोजी मुंबईत करण्यात आले आहे. रंगशारदा सभागृह वांद्रे येथे सायंकाळी 6 वाजता होणाऱया या मेळाव्यास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी दिली.

शिवसेना व संभाजी ब्रिगेडच्या या संयुक्त मेळाव्यास राज्यभरातील सर्व जिह्यांतील प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्याच्या पूर्वतयारीसाठी आज शिवसेना भवन येथे बैठक घेण्यात आली. या वेळी शिवसेना नेते सुभाष देसाई, उपनेते विश्वनाथ नेरुरकर, रवींद्र मिर्लेकर व प्रवीण महाले तसेच संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष मनोज साखरे, सौरभ खेडेकर, गंगाधर बनबरे, सुधीर देशमुख, संतोष गाजरे उपस्थित होते.