जालन्यातील घटनेविरोधात उमरखेडमध्ये कडकडीत बंद; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सकल मराठा समाजाने जालना जिल्ह्यातील घटनेचा निषेध करत बंद ची हाक दिली होती. यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील व्यापारी प्रतिष्ठान शाळा महाविद्यालय आज बंद आहेत. वाहतूक व अत्यावश्यक सेवा सुरू आहेत. उमरखेड बंदला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. रस्त्यारून तूरळक वाहतूक सुरू आहे. पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला असून सर्वत्र शांतता आहे.