गुंतवणुकीच्या नावाखाली वृद्धाची फसवणूक 

फॉरेन एक्स्चेंजमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देऊ असे सांगून ठगाने वृद्धाची फसवणूक केली आहे. फसवणूकप्रकरणी जुहू पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.

तक्रारदार हे ज्येष्ठ नागरिक असून ते विलेपार्ले येथे राहतात. त्याचा शेअर ट्रेडिंगचा व्यवसाय आहे. दोन वर्षांपूर्वी त्यांना एकाचा पह्न आला होता. त्याने तो सांताक्रुझ परिसरात राहत असल्याचे सांगितले. त्याची कंपनी असून त्याचे कार्यालय परदेशात असल्याचे भासवले. गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल सांगितले.  त्यांना अॅपवर 14 लाख रुपये अमेरिकन डॉलरचा नफा झाल्याचे दिसत होते. त्यामुळे त्यांनी ती रक्कम काढण्याचे ठरवले. मात्र ती रक्कम बँक खात्यात ट्रान्सफर होत नव्हती. त्यांनी त्या दोघांना पह्न केला. मात्र त्या दोघांनी टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. तक्रारदार यांनी त्या कंपनीची माहिती काढली तेव्हा त्या नावाची पंपनी नसल्याचे त्यांना सांगण्यात आले.