भयंकर! पॉर्न व्हिडीओ पाहून अल्पवयीन बहिणीवर बलात्कार

उत्तर प्रदेशमध्ये बहीण-भावाच्या नात्याला काळीमा फासणारी भयंकर घटना घडली आहे. मोबाईलवर पॉर्न पाहून सख्ख्या भावाने बहिणीवर बलात्कार केला आहे. त्यानंतर बहिणीचा गळा दाबून तिचा खून केला. या प्रकारानंतर कासंगजमध्ये खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी भावाला अटक केली असून पुढील तपास सुरू केला आहे.

3 फेब्रुवारी रोजी कासंगज येथे ही धक्कादायक घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार संजू (19) असं त्या आरोपी मुलाचे नाव आहे. संजू मोबाईलवर पॉर्न पाहत होता. त्यावेळी त्याची बहीण घरातच होती. अश्लिल व्हिडीओ पाहताना त्याला मोह आवरला नाही आणि त्याने 17 वर्षीय लहान बहिणीसोबत अश्लील कृत्य केले. बहिणीवर अत्याचार केल्यानंतर ती घडलेल्या प्रकाराबद्दल कोणालातरी सांगेल या भितीने त्याने तिचा गळा दाबून हत्या केली. त्यानंतर घाबरलेल्या अवस्थेत घटनास्थळावरून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी संजूचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले.

पोलिसांनी घडलेल्या प्रकाराची विचारणा केली असतासंजूने गुन्ह्याची कबुली दिली. संजूने सांगितले की, माझी आई नातेवाईकाकडे गेली होती. मी आणि माझी बहिण आम्ही दोघेच घरात होतो. मी घरात पॉर्न पाहत होतो. त्यानंतर बहिणीसोबत अत्याचार केले. याबाबत कुणाला कळू नये, त्यामुळे तिचा गळा दाबून खून केला असे तो म्हणाला. पोलिसांनी 24 तासांच्या आत आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू केला आहे. तसेच अल्पवयीन मुलीचा मृतदेह ताब्यात घेतला आहे.