महाराष्ट्राचा दबदबा घसरला; शेअर बाजारात नवे गुंतवणूकदार जोडण्यात उत्तर प्रदेश आघाडीवर

देश-विदेशातील गुंतवणूकदारांमुळे हिंदुस्थानातील शेअर बाजार सध्या उच्चांकावर आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी ऐतिहासिक उच्च स्तरांवर व्यापार करत आहेत. हिंदुस्थानातील शेअर बाजारातील उच्चांकाला जाण्याचे श्रेय घरगुती किरकोळ गुंतवणूकदारांना जाते. महाराष्ट्र आणि गुजरातमधील नागरिकांची यात सर्वात मोठी गुंतवणूक असते. परंतु एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱया नोंदणीकृत गुंतवणूकदारांच्या संख्येत उत्तर प्रदेश आघाडीवर आले आहे. उत्तर प्रदेशातून सर्वात जास्त गुंतवणूक होत आहे.

एनएसई डेटानुसार, नोव्हेंबर 2023 च्या अखेरपर्यंत एकूण 83.5 मिलियन रजिस्टर्ड गुंतवणूकदार होते. ही संख्या 14.6 मिलियन म्हणजेच 1.46 कोटी आहे. उत्तर प्रदेशातील एकूण 8.7 मिलियन (87.35 लाख) गुंतवणूकदार रजिस्टर्ड आहेत. गुजरात 7.5 मिलियन (75 लाख), 4.7 मिलियन (47 लाख) च्या संख्येसोबत कर्नाटक चौथ्या, 4.7 मिलियनसह पश्चिम बंगाल पाचव्या स्थानावर आहे. 2009-10 मध्ये देशातील रजिस्टर्ड एकूण गुंतवणूकदारांमध्ये उत्तर प्रदेशातील रजिस्टर्ड गुंतवणूकदारांची भागीदारी 6.1 टक्के होती. जी नोव्हेंबर 2023 मध्ये 10.5 टक्क्यांवर पोहोचली आहे.

वर्षाच्या अखेरला घसरण

वर्षाच्या अखेरच्या ट्रेडिंग सत्रात शेअर बाजारात घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्स आणि निफ्टी घसरणीसोबत बंद झाले. मिड कॅप, स्मॉलकॅप शेअरमध्ये खरेदी दिसली. मिडकॅप इंडेक्स उंच रेकॉर्डवर बंद झाले. ऑटो, एफएमसीजी, रियल्टी, मेटल शेअर्समध्ये खरेदी दिसली. तर एनर्जी, पीएसयू, पीएसई, आयटी शेअर्सवर दबाव राहिला. सेन्सेक्स 170.12 अंकावर म्हणजेच 0.23 टक्क्यांच्या घसरणीसोबत 72,240.26 अंकांवर तर निफ्टी 47.30 अंक म्हणजेच 0.22 टक्क्यांच्या घसरणीसोबत 21731.40 अंकांच्या स्तरांवर बंद झाले. शेअर बाजाराने लागोपाठ आठव्या वर्षी पॉझिटिव्ह रिटर्न दिले.