Lok Sabha Election 2024 – काँग्रेस सोडून भाजपात आले, अर्ध्या तासात तिकीट मिळाले

लोकसभा निडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने रविवारी पाचवी यादी जाहीर केली. या यादीमध्ये सेलिब्रिटी आणि वेगवेगळ्या पक्षांमधून आयात केलेल्या उमेदवारांची नावे दिसली. यातीलच एक नाव म्हणजे काँग्रेस सोडून भाजपमध्ये आलेले नवीन जिंदल यांचे आहे. विशेष म्हणजे रविवारी त्यांनी काँग्रेस सोडत भाजपमध्ये प्रवेश केला आणि अर्ध्या तासात त्यांना लोकसभेची उमेदवारीही मिळाली. जिंदल यांना हरियाणाच्या कुरुक्षेत्र मतदारसंघातून तिकीट देण्यात आले आहे.

हरियाणाच्या राजकारणामध्ये जिंदल कुटुंब अनेक दशकापासून सक्रिय आहे. भाजपने त्यांना ज्या कुरुक्षेत्र मतदारसंघातून तिकीट दिले आहे तिथूनच नवीन जिंदल हे 2004 आणि 20089 ला लोकसभेवर निवडून गेले होते. यूपीए सरकारच्या कार्यकाळात ते केंद्रात मंत्रीही होते. मात्र 2014मध्ये झालेल्या निवडणुकीत त्यांना पराभव सहन करावा लागला. पुढे झालेल्या हरियाणा विधानसभा निवडणुकीत त्यांची आई सावित्री जिंदल यांनाही पराभूत व्हावे लागले आणि तेव्हापासून जिंदल कुटुंब राजकारणातून बाजुला झाले.

आता तब्बल 10 वर्षांनी हरियाणाच्या राजकारणात पुन्हा एकदा जिंदल कुटुंबाची एन्ट्री झाली आहे. मात्र यंदा ते भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढणार आहेत. कुरुक्षेत्र आणि आसपासच्या भागामध्ये त्यांची चांगली पकड असल्याचे बोलले जाते आणि याचाच फायदा उठवण्याचा प्रयत्न भाजपकडून होत आहे.

Lok Sabha Election 2024 – उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश, मिळालं लोकसभेचं तिकीट

नवीन जिंदल हे जेएसडब्ल्यू ग्रुपचे चेअरमन आहेत. त्यांचा जन्म 9 मार्च 1970 ला झाला. 1982मध्ये जेएसडब्ल्यू समुहाची सुरुवात झाली. नवीन यांचे वडील सज्जन जिंदल यांनी याची सुरुवात केली होती. स्टील क्षेत्रापासून सुरुवात केलेला जिंदल समुह एनर्जी, इन्फ्रास्ट्रक्चर, सीमेंट आणि पेंट क्षेत्रातही उतरलेला आहे. हिंदुस्थानसह अमेरिका, यूरोप, यूएई ते चीलीपर्यंत त्यांचा व्यवसाय पसरलेला आहे. त्यांची एकूण संपत्ती 2.12 लाख कोटी रुपये असल्याची कळते. त्यांच्या आईची गणना हिंदुस्थानातील सर्वात श्रीमंत महिलेमध्ये होते.

Lok Sabha Election 2024 – माजी हवाईदल प्रमुखांचा भाजपमध्ये प्रवेश, तिकीट मिळण्याची शक्यता